विहिर अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याने स्वीकारली लाच

0

 

नंदुरबार : – विहिर अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारणार्‍या नंदुरबार पंचायत समितीतील विस्तार अधिकार्‍याला नंदुरबार एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने खळबळ उडाली आहे. . भैय्यासाहेब दिगंबर निकुंभे (53) असे संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे. सोमवारी दुपारी पंचायत समितीसमोरील चहाच्या टपरीवर हा सापळा यशस्वी करण्यात आला.

रनाळे खुर्द येथील 55 वर्षीय तक्रारदार यांचे रनाळे खुर्द, ता.नंदुरबार शिवारातील शेत आहे. या शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करून विहिरीच्या अनुदानाची रक्कम तक्रारदार यांना मिळवून देण्यासाठी नंदुरबार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भैय्यासाहेब दिगंबर निकुंभे (53) यांनी सोमवार, 12 जून रोजी पाच हजारांची लाच मागितली होती व तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी झाल्यानंतर सोमवार, 19 रोजी सापळा रचण्यात आला. पंचायत समिती कार्यालयाबाहेरील चहाच्या टपरीवर पंचांसमक्ष निकुंभ यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.