रूपेश पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान…

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथील रा.स.शि.प्र. मं. लि. चाळीसगाव संचलित माध्यमिक आश्रमशाळा लोणजे येथिल उपशिक्षक रुपेश यशवंत पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण पुरस्कार नुकताच मिळाला. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. धुळे येथील पद्मश्री टॉवर हॉल येथे झालेल्या समारंभात त्यांनी सहकुटुंब हा पुरस्कार स्विकारला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मानाचा फेटा, ट्रॉफी, छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. निसर्ग मित्र समितीचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी बिंदवाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील त्याचबरोबर महापौर प्रतिभा चौधरी,  विभागीय वनसंरक्षक पगार, रणजीत भोसले, प्रेमकुमार अहिरे, संतोष पाटील, डी.बी.पाटील, एच ए पाटील, मनोज पाटील, शरद पाटील, ललित पाटील, वाय.एम पाटील, अरुण पाटील हे उपस्थित होते. रुपेश पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल रा.स.शि.प्र.मं चे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण, सेक्रेटरी बाळासाहेब चव्हाण, व्हाईस चेअरमन पुष्पा भोसले, दुय्यम सचिव रावसाहेब साळुंखे व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा लोणजे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.