बर्ड फ्लू ने पुन्हा काढले डोक वर; नागपुरात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू…

0

 

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

नागपुरातून बर्ड फ्लू ने पुन्हा डोक वर काढले आहे. नागपुरात बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्याच्या मृत्यू झाला आहे. यानंतर शासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. शहरातील बर्ड फ्लूमुळे पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. मात्र नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याने इतर पोल्ट्री फार्म मालकांमध्ये चिंता वाढली आहे. तर बर्ड फ्लूमुळे मालकांना आर्थिक नुकसानीची भीती वाटू लागली आहे.

नागपुरात बर्ड फ्लूचा संक्रमण झाल्याचे समोर आलं आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक झाला. रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचे कारण तपासण्यासाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले. त्यानंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले. या प्रयोगशाळेचा चार मार्च रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजे एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे रिपोर्टमध्ये सिद्ध झाले.

कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर पाच मार्चच्या रात्री संबंधित पोल्ट्री फार्ममधील 8501 कोंबड्या मारण्याची प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेला कलिंग असंही म्हटलं जातं. तसेच फॉर्ममधील 16 हजार पेक्षा जास्त अंडीही नष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आलं. तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं.

नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रमधील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे मान्य केले. तसेच नागरिकांनी घाबरून जाण्याचा कारण नाही. तसेच शासनाने संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूमुळे नियमांचे पालन करत कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.