जिल्ह्यातील आरटीओची तीन भागात विभागणी

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे एकच होते. त्या कार्यालयाद्वारे आतापर्यंत एमएच १९ अशा प्रकारे वाहनांची नोंदणी होत असे. जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांचा विस्तार पाहता जळगाव आरटीओ कार्यालयावर फार मोठा ताण पडत होता. तसेच चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गावातील वाहनधारकांना १५० ते १६० किलोमीटरचा फेरा पडत होता. म्हणून जळगाव जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून दुसरे कार्यालय भडगाव येथे व्हावे, अशी गेल्या एक तपापासून मागणी होती. तथापि चाळीसगावचे भाजपचे तरुण तडफदार आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव येथे जळगाव आरटीओ चे दुसरे कार्यालय मंजूर करून आणले. त्याचे त्याचा वृत्त १६ फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यात पोहोचले आणि २३ फेब्रुवारीला चाळीसगाव येथे एमएच ५२ क्रमांकाची वाहन नोंदणी होण्यासंदर्भात चाळीसगाव आरटीओ कार्यालयाची अधिसूचना निघाली. भडगाव येथे येथील नागरिकांनी आम्ही भडगावकर या सर्वपक्षीय समितीची स्थापना करून भडगावला आरटीओ कार्यालय मिळालेच पाहिजे, म्हणून तीव्र आंदोलन सुरू केले. महायुती सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन भडगाव येथे आरटीओ चे तिसरे कार्यालय सुरू करण्याचे घोषित करून भडगाव आरटीओ तर्फे एमएच ५४ क्रमांकाची वाहन नोंदणी करण्याचे घोषित करून त्याचीही अधिसूचना जारी केली. ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे’ हा वाक्प्रचार खरा ठरला. चाळीसगाव एमएच ५२ आणि भडगाव एमएच ५४ वाहन नोंदणी आरटीओ कार्यालयाचा शुभारंभ आज गुरुवार दिनांक ७ मार्च रोजी होणार आहे.. त्यानंतर हे कार्यालय आता जळगाव जिल्हावासीयांच्या सेवेत रुजू होणार आहे. चाळीसगाव येथील आरटीओ कार्यालय अंतर्गत एकट्या चाळीसगाव तालुक्याचा समावेश असून त्या तालुक्यातील वाहनांची नोंदणी एमएच ५२ क्रमांकाने होणार आहे. चाळीसगाव तालुका तसा भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने मोठा असल्याने त्या तालुक्यातील वाहनधारकांच्या वाहनांची नोंद अथवा आरटीओ कार्यालयाशी असलेली तत्सम कामे आता गतीने होतील. तसेच वेळेची फार मोठी बचत होणार आहे. त्यामुळे जळगावच्या आरटीओ कार्यालयातील ताण विभागल्याने आपोआप कमी होणार आहे. तसेच जळगाव शहरात येऊन तासंतास बसावे लागणार नाही. त्यामुळे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना निश्चित चाळीसगाव तालुक्यातील नागरिक धन्यवाद देत असतील. दुसरीकडे भडगावकरांची जुनी मागणी उशिरा का होईना मान्य झाली. त्यामुळे भडगावकरांनी सुद्धा आरटीओ संदर्भातील कामे गतिमान पद्धतीने होतील. त्याचबरोबर भडगाव आरटीओ कार्यालयातला भडगावच्या लगत असलेल्या पाचोरा पारोळा एरंडोल आणि अमळनेर या तालुक्यातील गावे जोडल्याने त्या तालुक्यातील आरटीओ वाहन क्रमांक ५४ कसा राहणार आहे. त्यामुळे भडगाव लगतच्याच्या तालुक्यातील वाहनधारकांना भडगाव आरटीओ कार्यालय सोयीचे होणार आहे.

 

जळगाव जिल्ह्याचे आता तीन आरटीओ कार्यालयात विभागणी झाल्याने वाहनधारकांची सोय होत असली तर जळगाव जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयातील ताण भडगाव आणि चाळीसगाव कार्यालयापेक्षा जास्त पडणार आहे. कारण जळगाव, धरणगाव, भुसावळ, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड आणि जामनेर अश्या एकूण नऊ तालुक्यातील वाहनधारकांसाठी जळगावच्या आरटीओ कार्यालयावर भविष्यात ताण पडणारच आहे. तसेच भुसावळ येथे आरटीओचे कार्यालय व्हावे ही भुसावळकरांची जुनीच मागणी आहे. त्यामुळे भविष्यात जळगाव जिल्ह्यात आरटीओचे चौथे कार्यालय सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसंख्या वाढीबरोबर जिल्ह्यातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने चौथे कार्यालय सुद्धा सुरू करावे लागेल. परंतु चाळीसगाव आणि भडगाव येथे अनुक्रमे एमएच ५२ आणि एमएच ५४ या क्रमांकाचे वाहनांची नोंदणी गुरुवारपासून होईल. चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या एकट्या चाळीसगाव तालुक्यासाठी आरटीओ कार्यालय खेचून आणले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन त्याचबरोबर भडगावकरांची आरटीओ कार्यालयाची जुनी मागणी शासनाने मान्य करून भडगावकरांचेही समाधान केले आहे. पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रयत्न आणि प्रतिष्ठा पणाला लावून हे कार्यालय भडगावला खेचून आणले, त्याबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांचे अभिनंदन. भडगाव आणि चाळीसगाव हे दोन्ही तालुके जवळजवळ असल्याने दोन कार्यालयातील अंतर कमी असल्याबद्दल थोडी टीका होते आहे. तथापि वाद न वाढवता सामंजस्याने घ्यावे एवढीच विनंती…!

Leave A Reply

Your email address will not be published.