गेल्या पाच वर्षापासून महिलेवर अत्याचार करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

0

जळगाव;- रावेर तालुक्यातील निंभोरा येथे लग्न झाल्याचे महिलेला लपवून तिच्यावर गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या एका विरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गेल्या पाच वर्षापासून तीस वर्षीय पीडित महिलेला गावात एका भाड्याच्या घरामध्ये राहून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण करून लग्न झाल्याचे लपवून पीडिते सोबत लग्न करण्याचे खोटे आम्हीच दाखवून तिची फसवणूक करून तिला व तिच्या मुलांना चापटा व त्यांनी मारहाण करून अत्याचार करणारा रवींद्र श्रावण वीचवे रा. निंभोरा याचा विरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनला पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कुणाल सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.