भुसावळ येथे घरात घुसून दांपत्याला पितळी फ्लॉवर पॉटने मारहाण करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

0

भुसावळ;- शहरातील स्वप्नपूर्ती गडकरी नगर मध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त महिलेच्या घरात दोन अज्ञात इसमांनी 14 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घुसून तिच्या पतीला व महिलेस दोन पितळी फ्लावर पॉटने मारहाण करून एक लाख 83 हजार रुपयांची रोकड आणि दागिने जबरदस्तीने दोन अज्ञात इसमाने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भुसावळ शहरातील स्वप्नपूर्ती गडकरी नगर तुळजाभवानी मंदिराजवळ खडका रोड येथे राहणाऱ्या माधुरी विजय कुलकर्णी वय 66 हे सेवानिवृत्त कर्मचारी असून 14 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसमाने घरात घुसून महिलेस व तिच्या पतीला पितळी फ्लावर पॉट ने मारहाण करून जबरदस्तीने एक लाख रुपयांची रोकड, 36 हजार रुपये किमतीचे कानातील साखळी ,झुमके ,दोन सोन्याच्या अंगठ्या ,बारा हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले ,पाच हजार रुपये रोख असे एकूण एक लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी माधुरी कुलकर्णी यांनी बाजार पेठ पोलीस स्टेशन गाठून दोन अध्याय चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.