घरात घुसून एकावर कोयत्याने वार ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

जळगाव ;-शहरातील रचना कॉलनी येथे एकाच्या घरात घुसून कोयत्याने डोक्याला मारून दुखापत करून घरातील वस्तूंची नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दत्त मंदिराजवळील रचना कॉलनी येथे राहणारे गोपाल मधुकर चौधरी 48 यांच्या घरात 14 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास आरोपी शेंड्या उर्फ सुनील रसाळ राठोड अनिल रसाळ राठोड दोन्ही रा.कांचन नगर जळगाव तांडव उर्फ विशाल पदमसिंह परदेशी रा. कुसुंबा व अन्य एक अनोळखी यांनी गोपाल चौधरी यांच्यासह त्यांचे पत्नीला मारहाण करून घरातील वस्तूंची नासधूस केली. तसेच त्यांच्या घराबाहेर उभे असलेल्या बुलेट व स्प्लेंडर मोटरसायकलची तोडफोड करून नुकसान करत आमचा ग्रुप मोठा असून तुला मारून टाकू अशी धमकी त्यांनी गोपाल चौधरी यांना दिली. याबाबत गोपाल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.