जगाच्या विकासकार्यात अभियंत्यांचे मोठे योगदान – प्रा. डॉ. संजय शेखावत

0

जळगाव;- तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाल्याने सर्वच क्षेत्रात आमूलाग्र क्रांती होत आहे. अभियंत्यांच्या कामामुळे जगासोबतच आपला भारत देश विकसित होत असल्याचा विश्वास जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील अभियंता दिन या कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अ‍ॅकडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी व्यक्त केला. प्रसिद्ध अभियंते व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या अनुषगाने ता. १५ रोजी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अ‍ॅकडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.बिपासा पात्रा, संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख मुकुंद पाटील, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख शंतनू पवार, इलेक्ट्रोनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील, प्रा. जितेंद्र वडद्कर हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बिपासा पात्रा यांनी केले. त्यात त्यांनी महाविध्यालयाची शैक्षणिक व उपक्रमाची माहिती दिली यानंतर मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील बदल व आयटीतील प्रगतीमुळे झपाट्याने बदल होत आहेत. अभियंत्यांमुळे देश ओळखला जात आहे. अभियांत्रिकीत आता मोठे बदल झाले आहेत. विषयांची संख्या वाढली आहे. आगामी काळात गुणवत्ताप्रधान व पर्यावरणाचा समतोल राखणारे बदल अभियांत्रिकीत अपेक्षित आहे. तसेच नॅनोटेक्नॉलॉजीचे क्षेत्र झपाट्याने वाढणार असून नवीन बदलांमध्ये भविष्यात मेकॅट्रॉनिक्स, नॅनोटेक्नॉॅलॉजीला महत्त्व असेल. आॅटोमोबाइल इंडस्ट्रीजचे महत्त्व वाढेल. आयटीमुळे अभियांत्रिकी क्षेत्राला सर्वाधिक बदल घडवता आले. ही जबाबदारी वाढणार आहे. मल्टिटास्किंगवर अधिक भर द्यावा लागेल असे नमूद केले. यानंतर रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता यांनी अत्याधुनिक सुविधाप्रधान प्रणालीचे महत्त्व वाढणार आहे. त्यासाठी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात काही बदल करावे लागतील. विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवणे व योग्य मनुष्यबळ निर्मितीला महत्त्व असणार आहे. नॅनोटेक्नॉलॉजीमुळे मायक्रो प्रॉडक्टद्वारे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणा-या टेक्नॉलॉजीला महत्त्व असेल असे नमूद केले. तसेच संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी आमच्या वेळी केवळ संगणक पाहायला मिळायचे, मात्र हाताळायला मिळत नव्हते. काळानुरूप अभियांत्रिकी क्षेत्रात बदल झाले. येणारा काळ हा थ्रो आऊटचा आहे. मोठ्या संगणकांची गरज भासणार नाही, तर हातात मावेल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल. त्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याची मुभा असावी असे सांगितले. तसेच सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख शंतनू पवार यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी जोड अभियांत्रिकी क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे पुढील काळात सर्वच क्षेत्र अभियांत्रिकीसोबत जोडली जातील. पर्यावरणाचा समतोल राखणारे बदल अभियांत्रिकी क्षेत्रामुळे होणा-या बदलांकडून अपेक्षित आहेत. मेकॅट्रॉनिक्स आणि नॅनोटेक्नॉलॉजीचे जाळे यामुळे वाढेल असे त्यांनी म्हटले तसेच इलेक्ट्रोनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात पूर्वी मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स व सिव्हिल या तीन शाखांचा अभियांत्रिकीमध्ये समावेश होता. अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती. सध्या अभियांत्रिकी क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. यात मुलींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. आगामी काळ नॅनो टेक्नॉलॉजी, मेकॅट्रॉनिक्स आणि मल्टिटास्किंग पद्धतीतील बदल आणि इन्फ्रास्ट्रक्चरमधील विकास असणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांसाठी टॉय मेकिंग स्पर्धा व मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे लवकरच घेण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ स्पर्धेबद्दल प्रा. डॉ. श्रिया कोगटा यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात विविध विभागातील विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. तर कार्यक्रमाचे समन्वय प्रा. बिपासा पात्रा, प्रा. स्वाती पाटील, प्रा. मनीष महाले, प्रा. पी.बी. गोसावी, प्रा.शीतल जाधव, प्रा. मधुर चव्हाण यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.