संतापजनक : दुधात झोपेच्या गोळ्या देऊन विवाहितेवर अत्याचार

0

जळगाव ;- ;- घर काम करणाऱ्या एका विवाहीतेवर दुधात गोळ्या टाकून झोपेतच लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शहरातील उघडकीस आली असून या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरालगतच्या असणाऱ्या एका कॉलनीमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेची पाचोरा तालुक्यातील जयदीप पाटील (वय ३०) नावाच्या तरुणासोबत ओळख होती. त्याने गरम दुधात गोळ्या टाकून ते दूध तिला पिण्यास दिले. पिडीतेला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यासोबत झोपेतच शरीर संबंध प्रस्थापीत केले. ज्यावेळी हा प्रकार पिडीतेच्या लक्षात आला त्यावेळी तिने त्याला जाब विचारला. पण तू जर हा प्रकार तुझ्या पतीला सांगितला तर तुझा, तुझ्या मुलाचा आणि तुझ्या पतीचा , मर्डर करेन, अशी त्याने पिडीतेला धमकी दिली. एवढेच नव्हे तर जयदीप हा पिडीतेसोबत वेळोवेळी लैंगिक अत्याचारसह मारहाण करत होता. याबाबत रामानंद नगर पोलिसांत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहीदास गभाले करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.