नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवतीवर अनैसर्गिक अत्याचार ; एकाला अटक

0

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १ लाख रुपये घेऊन युवतीवर नेसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन एकाला अटक करण्यात आली आहे.

एका २९ वर्षीय पीडित युवतीला नोकरीचे आमिष देणारा असिफ हुसेन खान (वय ४५) याने २१ जून २०२१ ते २७ मार्च २०२३ च्या दरम्यान, पिडीतेकडून एक लाख रुपये घेतले. तसेच पिडीतेसोबत बळजबरी अमानुषपणे नैसर्गिक व अनैसर्गिक वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला संबंधाबाबत कोणास काही एक सांगितले तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी असिफ खानला अटक केली आहे. पुढील तपास सपोनी दिपक बिरारी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.