वाळूचे ट्रॅक्टर घरात घुसल्याने ११ वर्षीय मुलगी ठार

0

भडगाव तालुक्यातील आमडदे येथील घटना

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

वाळूचे ट्रॅक्टर घरात घुसल्याने या अपघातामध्ये एक ११ वर्षीय बालिका ठार झाल्याची दुर्दैवी घटना आमडदे जवळील वलवाडी रस्त्यावर एका वस्तीत आज सकाळी घडली . या घटनेत वैशाली बालू सोनवणे (११) ही बालिका जागीच ठार झाली. तिची बहीण पिंकी सोनवणे (५) आणि घराशेजारी राहणारी बानूबाई वाघ (४४) या जखमी झाल्या. जखमींंना जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेनंतर चालकाने घटनास्थळाहून पलायन केले .

वाळू माफियांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयत बालिकाचे कुटुंबीय आणि ग्रामस्थानी घेतल्याने संतप्त वातावरण होते. पुढील तपास भडगाव पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.