पुण्यात शुल्लक कारणावरून दोन ठिकाणी चाकू हल्ला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

शुल्लक कारणावरून शहरातील दोन ठिकाणी चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पहिली घटना रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गात घडली. तर दुसरी घटना ही डेक्कन ओरिसारात घडली आहे. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली चाकू हल्ल्याची घटना पुणे रेल्वे स्टेशनजवळ भयारीमार्गात घडली. सूरज परताने असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक कृष्णकांत श्रीराम यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज परताने हे रेल्वे भुयारी मार्गातून जात असतांना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे तंबाखू मागितली. सुरज यांनी तंबाखू दिली नाही. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि अनोळखी व्यक्तीने सुरज यांच्या पोटात चाकू भोसकला. या हल्ल्यात सुरज गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे यांनी दिली.

तर दुसरी चाकू हल्ल्याची घटना डेक्कन परिसरात घडली. या घटनेत एका विद्यार्थ्याने इन्टिट्यूट चालकावर चाकू हल्ला केलाय. अभ्यासक्रमातून काढल्याचा राग आल्याने विद्यार्थ्याने हा हल्ला केला. संकल्प योगेश जांदे (वय २३, रा. आंबेगाव बुद्रुक जांभुळवाडी रस्ता, कात्रज) असं इन्स्टिट्यूट चालकाचं नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी ऋषिकेश अशोक नाडे या तरुणाला अटक केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रस्त्यावर कर्णिक प्लाझा इमारतीमध्ये आयटी प्रिन्यूअर नावाचे इन्स्टिट्यूट आहे. दरम्यान चाकू हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्तणूक चांगली नसल्याने जांबे यांनी त्याला अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा इ-मेल केला होता. त्याचा राग मनात ठेवून विद्यार्थ्याने अभ्यासक्रमास प्रवेश द्या, नाहीतर जीवे मारतो, अशी धमकी देत जांबे यांच्याच्या पोटात चाकू भोसकला.

Leave A Reply

Your email address will not be published.