आंतराष्ट्रीय घड्याळ कंपन्यांचा बनावट माल जप्त

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आंतराष्ट्रीय ब्रँड असलेल्या घड्याळांसह त्याचे बनावट सुटेभाग निर्मिती आणि विक्री करणाऱ्या फुले मार्केटमधील दुकानावर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून १६ हजार ६४० रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे.

संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत दुकानमालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नवी दिल्लीतील एसएनजी सॉलिसिटर एलएलपी या लागलं फर्मला मिळालेल्या माहितीच्या आधारे गेल्या दोन दिवसांपासून कंपनीचे तज्ज्ञ आणि अधिकारी शहरातील विविध शोरूम्स आणि दुकानात तपासणी करत होते. त्यांनी फुले मार्केटमधील दहा ते बारा दुकानात माहिती संकलित केल्यावर बुधवारी (ता. १) तक्रार देऊन शहर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. फुले मार्केटमधील एल पट्टा दुकानातील बाँबे फॅन्सी व न्यू अनिता वॉच ॲण्ड कंपनी दुकानात जाऊन पाहणी केली.

परंतु त्या ठिकाणाहून त्यांना काही मिळावे नाही. त्यानंतर त्याच परिसरातील आनंद टाइम सेंटर या ठिकाणी त्यांनी छापा टाकून तपासणी केली. त्याठिकाणी टायटन कंपनीच्या बनावट डायल केस व इतर सुटे भाग पथकाला मिळून आले. जप्त सर्व माल आंतराष्ट्रीय ब्रँड असलेल्या कंपन्यांची कॉपी असल्याचे प्रमाणपत्र पोलिसांना दिले. या प्रकरणी गौरव तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुकानमालक भारत चिमनदास तलरेजा (वय ६५, रा. शालिमार सोसायटी, गणपतीनगर) यांच्याविरुद्ध कॉपीराइट ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.