सोशल मीडियावर धामिर्क भावना दुखावणाऱ्या पोस्ट, ४ जणांविरद्ध गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

असोदा (ता. जळगाव) येथील चार सोशल मीडियात धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकली. या प्रकरणी चौकशीअंती मंगळवारी (ता.३१) रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आसोदा येथील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर विशिष्ट धर्माच्या महापुरुषाचे फोटो चिटकवून फोटोला आग लावण्यात आल्याचे छायाचित्र असलेली पोस्ट टाकून गावात जातीय तणाव निर्माण करीत दंगल घडविण्याचा प्रयत्न केला. व्हायरल पोस्टमध्ये आसोदा गावातील चार जणांचे फोटो होते. ही पोस्ट ‘व्हायरल’ झाल्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे कृत्य केल्याचे समोर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.