आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात वाढ करण्याचे आरोग्य मंत्र्यांनी दिले आश्वासन

गटप्रवर्तक यांचा निर्णय प्रबलीत

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

दि. १८ आँक्टोबर पासून आशा स्वंयमसेविका व गट प्रवर्तक यांनी जळगाव जिल्हा परीषदवर आपल्या विविध मागण्यासाठी आदोलन करुन बेमुदत काम बंद आदोलन सुरु केले आहे. आरोग्य भवन येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याशी आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली.

बैठकीत आशा स्वयंसेविका यांना राज्य शासन मोबदला पाच हजार वरून दरमहा बारा हजार +नियमित मानधन तीन हजार असा एकूण पंधरा हजार रुपये, गटप्रवर्तक यांना राज्य शासन मोबदला सहा हजार दोनशे रुपये वरून रू.१२४००/- +८४७५= रू.२०८७५/- करण्याबाबत चर्चा झाली आहे. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना दोन हजार रुपये भाऊबीज देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली तसेच ठोस निर्णयासाठी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येईल, गटप्रवर्तक यांना पूर्वीप्रमाणेच कंत्राटी कर्मचारी म्हणून ठेवावे आणि कंत्राटी कर्मचारी म्हणून समायोजन करण्यासाठी सर्व कागदपत्रे तपासून समायोजन करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल असे मंत्री महोदयांनी सांगितले.

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठक खेळीमेळीचे वातावरण पार पडली. परंतु तरी निर्णय होई पर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. असे माया परमेश्वर,रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.