अत्रे वकील द लॉ चा रविवारी ‘शतकपूर्ती’ सोहळा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अत्रे वकील द लॉंग फॉर्म यांच्यातर्फे शतकृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, अत्रे वकील या नावासह 2023 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहे. या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता जैन हेल्थ शिरसोली रोड जळगाव येथे करण्यात आले असून या कार्यक्रमास महाराष्ट्रातील वकील क्षेत्रातील प्रत्येक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती एक रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अत्रे वकीलचे ज्येष्ठ विधी तज्ञ एडवोकेट सुशील अत्रे यांनी दिली.

परिषदेची प्रस्तावना ज्येष्ठ ऍडव्होकेट ए आर माथूरवैश्य यांनी केली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती भंगाळे, एडवोकेट उज्वल निकम, अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीरा खडक्कर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची उपस्थिती असेल.

एखाद्या व्यवसायात १०० वर्ष एकाच ठिकाणी चार पिढी कार्यरत असणे हे कमी पाहायला मिळते. यानिमित्ताने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आवर्जून उपस्थिती लाभणार आहे. १०० वर्ष वकिलीच्या प्रवासात एकूण 4 पिढ्या सलग कार्यरत आहे.

प्रसंगी शतक पूर्वी महोत्सवानिमित्त स्मरणिकेचे ही प्रकाशन करण्यात येणार आहे सोशल्य अत्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषद प्रसंगी प्रदीप रायसोनी, अनिल कांकरिया, जैन उद्योग समूहाचे अनिल जोशी, एडवोकेट पंकज अत्रे, एडवोकेट निशांत अत्रे, एडवोकेट पद्मनाभ देशपांडे, एडवोकेट आनंद मुजुमदार, एडवोकेट अविनाश पाटील, एडवोकेट राहुल झंवर,  एडवोकेट सुधीर कुलकर्णी, यांची उपस्थिती होती. तरी आपण सर्वांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.