जळगावात तरुणाने घेतला गळफास !

0

जळगाव ;- तरूणाने आईला फोन करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकेतन समाधान पाटील वय-३३ रा. साईकृपा अपार्टमेंट, खोटे नगर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे निकेतन पाटील हा आईसोबत वास्तव्याला होता. गुरूवारी १८ जानेवारी रोजी निकेतनची आई ही मजूरीसाठी गावात कामाला गेलेल्या होत्या. त्यामुळे निकेतन हा घरी एकटाच होता. त्याने दुपारी आईला फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई आणि लहानभाऊ रितेश असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.