एसडी सीड तर्फे अचूक करियर निवडीसाठी कार्यशाळा

0

जळगाव:;– एसडी सीडचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल उपक्रमांमधून त्यांच्यातील सुप्त कौशल्यांचा विकास व्हावा तसेच शिक्षक आणि पालकांसाठीसुद्धा योग्य ते समुपदेश व्हावे यासाठी शिक्षण प्रणालीमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिन्ही घटकांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न एसडी सीडच्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन व कार्याध्यक्षा मीनाक्षीताई जैन यांच्या मार्गदर्शनातून केले जात आहेत.

 

आज करिअरची अनेक क्षेत्रे तरुणांसाठी खुली आहेत. करिअरची अचूक निवड म्हणजे यशस्वी भविष्यकडे वाटचाल म्हणून विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडता यावे त्यांच्यातील बलस्थाने, कमतरता, कौशल्य आणि त्यांची आवड लक्षात घेऊन कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल याविषयी त्यांना मागदर्शन मिळावे या उद्देशाने सीड म्हणजेच सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना जळगाव यांच्या वतीने श्रीमती प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय, सुप्रीम कॉलोनी, जळगाव येथे एसडी सीड समन्वयक श्री. प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनात “करिअर मार्गदर्शन” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सोनवणे यांनी मार्गदर्शनात सांगितले कि, करिअरची दिशा हि दहावीनंतरच ठरविली पाहिजे. आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्वाचे मानले जाते. करिअरचे नियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात. विद्यार्थ्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. तसेच आयुष्य जगण्याचा उत्तम मार्ग म्हणजे करिअर आहे. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे आणि ती या शालेय वयातच निर्माण होणे अत्यंत महत्वाचे आहे. आज करिअरची अनेक क्षेत्रे तरुणांसाठी खुली आहेत. तुमची क्षमता कौशल्य व आवड यांचे विश्लेषण करून तुम्हाला सुयोग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना दहावी नंतर उपलब्ध विविध अभ्यासक्रमाची माहिती दिली.

सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या: त्यात प्रामुख्याने दहावी नंतर कुठल्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे कसे ठरवावे?

+ स्वतःला ओळखा

+ तुमच्यातील बलस्थाने, कमतरता, कौशल्य आवड यांची सुयोग्य जाणीव असू द्या

+ करिअर समुपदेशन व सल्ला घ्या

+ पालकांशी सुयोग्य संवाद साधा

+ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळवा

+ कोणत्या विषयात करिअर करायचे आहे ते आधी समजून घ्या

+ त्या विषयातील नौकरीच्या संधी कोणत्या ते माहिती करा

+ इंटरनेट, फेस बुक whatsapp यांचा करिअर विषयी माहिती मिळविण्यासाठी वापर करा

सदर कार्यशाळेला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.गजानन सुर्यवंशी, सौ. रुपाली रोझतकर तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गजानन सूर्यवंशी आणि विद्यालयांच्या व्यस्थापनाबद्दल एसडी-सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केले आहे-

Leave A Reply

Your email address will not be published.