‘मैं अटल हूं’ चित्रपट दाखवला जाणार विधिमंडळात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलीवूड अभिनेता ‘पंकज त्रिपाठी’ चा बहुप्रतीक्षेत ‘मैं अटल हूं’ चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे.

पंकज त्रिपाठी या चित्रपटांमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहे. आता या चित्रपटाचे सोशल स्क्रीनिंग महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहात देखील करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली.

राहुल नार्वेकर यांनी संगितले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाची स्क्रीनिंग विधिमंडळ सभागृहात होणार आहे. सर्व आमदार आणि मंत्री यांना या चित्रपटासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. राजकीय जीवनातून समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विचार यातून सध्याच्या समाजास हा चित्रपट मार्गदर्शक ठरणार आहे.

देशाचे सर्वांचे लाडके नेते अटलबिहारी वाजपेयी, शिक्षण, विज्ञान, पायाभूत सुविधा, आणि जागतिक संबंध मजबूत करण्यासाठी त्यांच्या योगदानासाठी प्रसिध्द होते. या चित्रपटामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे बालपणीचे दिवस, राजकीय कारकीर्द, बदल घडवून आणण्यासाठी आणि भारताला एक महान राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे दाखवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.