माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

0

मुंबई ;-राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.

राज्याच्या राजकारणात होल्ड असणारा नेता म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं. मराठवाड्यातही अशोक चव्हाण यांच्या नावाला वलय आहे. अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशोक चव्हाण हे राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे मराठवाडा आणि विशेषत: नांदेडमध्ये त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. हिंगोली, लातूर आणि अर्थातच नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकारणात अशोक चव्हाण यांचा वरचषमा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.