दुर्दैवी : लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुण ठार

0

 

कुटुंबातील एकुलते मुले असल्याने तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला

सातारा , लोकशाही न्यूज नेटवर्क
साताऱ्यातील लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुणांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एसटी बसने दिलेल्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही तरुण हे आपापल्या कुटुंबातील एकुलती लेकरे होती त्यामुळे तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनिल नामदेव थोपटे -गायकवाड वय २५ वर्ष, पोपट अर्जन थोपटे -गायकवाड वय २३ वर्ष, ओंकार संजय थोपटे-गायकवाड वय २२ वर्ष(सर्व रा. पिंपरे बु. थोपटेवाडी, ता. पुरंदर) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत ..

तिन्ही तरुण कामानिमित्त ते लोणंद या ठिकाणी गेले होते. मात्र घरी परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. लोणंद -निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस (क्रमांक एमएच २०बीएल ४१५८) व निरेकडून लोणंद निघालेली मोटारसायकल (क्रमांक एमएच १२ आरव्ही ३१५८) यांच्यात जोरदार धडक झाली. त्यात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला.

थोपटेवाडी ग्रामदैवत असलेल्या हनुमानाचा यात्रा उत्सव सुरू होता. मात्र मुलं गेल्याची खबर येताच संपूर्ण यात्रेवर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर यात्रा थांबवण्यात आली. सर्व गाव थोपटे कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आहे. तिन्ही कुटुंबातील ही एकुलती एक मुलं असल्याने आई वडिलांवर आभाळच फाटलं आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.