लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करून उकळले ४ लाख

0

चाळीसगाव . लोकशाही न्यूज नेटवर्क
लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेऊन पीडितांच्या फायदा घेऊन तिच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये उकळून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात उघडकीस आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, पीडिता हि शहरातील एका परिसरात राहत असून आरोपी निरंजन अशोक लद्दे हा पिडीतास १९९८ पासून वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून मला माझी बायको आवडत नाही तूच माझे एकमेव प्रेम असून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर पीडिता गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपातही एका डॉक्टरकडे केला. मला अडचण असल्याचे सांगून आरोपीने सोन्याची चैन ,अंगठी घेतली . ४ एप्रिल रोजी आरोपीने पीडितेला धमकी देऊन तू लग्न आणि पैसा याचा तगादा लावल्यास तुझ्या नावाचा उल्लेख करून आत्महत्या कारेन अशी धमकी दिल्याची फिर्याद ४३ वर्षीय पिडीतेने दिली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून तपास सपोनि सचिन कापडणीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.