“झिंक” अन्नद्रव्यांचे पिकातील महत्व

0

लोकशाही विशेष लेख

 

पिकांच्या जोमदार वाढीसाठी विविध अन्नद्रव्यांचे महत्व अनन्य साधारण आहे. माणसाला जशी क्रिया करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते त्याच पद्धतीने पिकांना वाढ तसेच फळ-फुल उत्पादन निर्मितीकरिता अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. पिकांना लागणाऱ्या प्रमाणानुसार अन्नद्रव्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण असते मुख्य अन्नद्रव्ये यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या समावेश असतो तर दुय्यम अन्नद्रव्ये त्यांचा तुलनेत कमी प्रमाणात लागतात यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर मोडतात तद्नंतर सर्वात कमी प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये म्हणजे लोह, मंगल, जस्त (झिंक), तांबे, बोरॉन, मोलाब्द, क्लोरीन आणि निकेल. या प्रकारापैकी “झिंक” (Zinc) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती आम्ही सदर लेखात मांडण्याच्या प्रयत्न करीत आहोत. झिंक हे अन्नद्रव्य पिकास कमी प्रमाणात लागत असले तरी पिकांवर याच्या मोठा प्रभाव जाणवतो. झिंक च्या कमतरतेमुळे पिके कोरडी पडल्याची लक्षणे जाणवतात. धान्य पीक जसे मका (Maka), ज्वारी (Jwari ), गहू (Gahu) आदी पिकांमध्ये झिंक अन्नद्रव्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. धान्य पिकात झिंक च्या वापराने पिकाची जोमदार वाढ होऊन उत्पादनात दीड पटीने वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

झिंक अन्नद्रव्यांचे महत्व

१) झिंक चे मूलभूत कार्य प्रथिने (प्रोटीन) निर्मितीत असून पिकांच्या परीपक्वतेवर त्याच्या परिणाम होतो.
२) झिंक मुळांचा वाढीस देखील कारणीभूत ठरते पिकातील हरितलवक तसेच कार्बोदकच्या निर्मितीत झिंक महत्वाचे आहे.
३) झिंकचा जमिनीतील कमतरतेमुळे मुळांपासून होणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढते.
४) कांदा पिकात तणनाशक वापरत असताना त्यासोबत चीलेटेड झिंक वापरल्यास कांदा पिकाला तणनाशकाच्या झटका बसत नाही. तसेच पात वाढीस देखील मदत होते.

५) इतर पिकांच्या तुलनेत मका पिकास झिंक ची सर्वाधिक आवश्यकता असते. मका पिकात झिंक ची कमतरता झाल्यास उत्पादनात १० ते १५ टक्यांची लक्षणीय घट होते.

झिंकचे स्त्रोत

आज बाजारात विविध कंपन्यांचे झिंक उपलब्ध आहेत. झिंक सल्फेट खताद्वारे देता येऊ शकते. याखेरीज फवारणी द्वारे देखील पिकास झिंकचा पुरवठा करता येऊ शकतो. झिंक ऑक्साईड ३९% लिक्वीड द्रव रुपात बाजारात उपलब्ध असून चिलेटेड झिंक १२% पावडर स्वरूपात बाजारात मिळू शकते. प्रती १५ लिटर फवारणी पंपास २५ ते ३० ग्राम झिंक वापरून फवारणी करावी.

परेश पालीवाल
श्री नाटेश्र्वर कृषी सेवा केंद्र, लासूर
मो. ८३७८०९६३०३

Leave A Reply

Your email address will not be published.