साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता १५ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ६०% किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त झाले असतील. अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुणक्रमांकानुसार जिल्हयातील प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांस निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे.

उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. त्यामुळे संपूर्ण कागदपत्रानिशी जिल्हा कार्यालयात अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक १५ जुलै, २०२३ पर्यंत देण्यात आलेली आहे. उशिरा आलेल्या अर्जाचा मुख्यालयामार्फत विचार करण्यात येणार नाही.

मार्कशीट, (गुणपत्रक), शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दोन पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकिट व जिल्हा व्यवस्थापकांच्य नावे शिष्यवृत्ती  मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रासह कार्यालयात संपर्क साधावा.

 

जिल्हा कार्यालयाचा पत्ता :

जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, महाबळरोड, मायादेवी नगर स्टॉप समोर, हतनुर कॉलनी, जळगाव फोन. नं. ०२५७ -२२६३२९४ येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या., जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.