दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्काकरिता अर्ज करण्याचे आवाहन

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग व्यक्ती व संस्था करिता राष्ट्रीय पुरस्कार सन २०२३ करिता नामांकन व अर्ज गृह कामकाज मंत्रालयाच्या केंद्रीकृत पोर्टलवर ( www.awards.gov.in ) केवळ ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

सदरचे अर्ज / नामांकन मागविण्याच्यादृष्टीने दिनांक १५ जून ते ३१ जुलै, २०२३ या कालावधीकरिता संकेत स्थळ उघडले आहे. राष्ट्रीय पुरस्कार सन २०२३ या करिता अर्ज / नामांकने केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या (URL) www.awards.gov.in ) या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करून सादर करावेत. पोस्टाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील विभागाच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या दिव्यांग व संस्था करिता राष्ट्रीय पुरस्कार या बाबतच्या मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद केलेले आहेत.

तरी जळगांव जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व संस्था यांनी विहित कालावधीत दिनांक ३१ जुलै २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. असे आवाहन विजय रायसिंग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.