कोळी समाज बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास ॲड. रोहिणी खडसे यांचा पाठिंबा

0

जळगाव ;- आदिवासी कोळी समाजा तर्फे जात वैधता प्रमाणपत्र व इतर मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे यात कोळी समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलक समाज बांधवांसोबत चर्चा केली व आंदोलनास पाठिंबा दर्शवला.

यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीचे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत. ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, आदिवासी कोळी समाजाच्या विकासासाठी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या नावे विकास महामंडळ स्थापन करावे यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत
समाज बांधवांच्या या मागण्या रास्त आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या आंदोलनास पाठिंबा आहे .

आ. एकनाथराव खडसे आणि इतर नेत्यांनी आदिवासी कोळी समाज बांधवांच्या जात वैधता प्रमाणपत्रा बाबत अनेक वेळा विधानमंडळात प्रश्न मांडला
आदिवासी कोळी समाज बांधव इथे उपोषणास बसले असताना जिल्हयातील तिन्ही मंत्र्यांना उपोषणाला भेट देण्यासाठी वेळ नाही मंत्री महोदयांनी व प्रशासनाने उपोषणास भेट देऊन या समाजाच्या मागण्या बाबत योग्य मार्ग काढावा
आदिवासी कोळी समाज बांधवांच्या जात वैधता प्रमाणपत्रा बाबत आगामी अधिवेशनात सुध्दा आ एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून या प्रश्न मांडला जाईल असे ॲड. रोहिणी खडसे यांनी आंदोलकांना आश्वासन दिले.

तसेच आदिवासी कोळी, मराठा, राजपूत, लिंगायत, मुस्लिम व इतर समाज आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत सरकारने या आंदोलनांची दखल घेऊन या समाज बांधवांना न्याय देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी,दशरथ कांडेलकर, नितीन कांडेलकर, संजय कोळी, प्रविण कांडेलकर, दिपक पाटील आणि आदिवासी कोळी समाज बांधवांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.