Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»रा.कॉ.महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांचे नेतृत्व ठरतेय प्रभावी
    जळगाव

    रा.कॉ.महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांचे नेतृत्व ठरतेय प्रभावी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई येथील पहिल्याच बैठकीला राज्यभरातील महिला पदाधिकाऱ्यांची भरगच्च उपस्थिती.

    जळगाव /मुक्ताईनगर ;- रोहिणीताई खडसे एक उमदं नेतृत्व…! राजकारणाचा फारसा अनुभव नसला, तरी त्यांना महाराष्ट्राचे ज्येष्ठ,मुत्सद्दी नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या तालमीत राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे . शैलीदार व अभ्यासू वक्तृत्व आक्रमक नेतृत्व आणि जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करण्याची धडपड यामुळे राजकारणात परिपक्व असल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीतून दिसून येते. त्यांच्या अंगीभूत असलेली ही चुणूक हेरून राजकारणातील जाणता राजा असलेल्या शरद पवार यांनी रोहिणी ताईंकडे थेट महिला प्रदेशाध्यक्षपदाची खूप मोठी जबाबदारी सोपवली. त्यांच्या नेतृत्वाखाली दि. 11 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरला आयोजित बैठकीला राज्यातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भरगच्च उपस्थिती होती. नियोजनबद्ध यंत्रणेद्वारा अत्यंत यशस्वीरित्या पार पडलेल्या या बैठकीने मात्र रोहिणीताईंची राजकारणातील परिपक्वता अधोरेखित केली.

    या बैठकीला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया ताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील , राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, पक्षाच्या नेत्या मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखाताई पेडणेकर, व महिला कार्यालयीन सचिव स्वातीताई माने यांचेसह राज्यभरातून आलेल्या विविध जिल्ह्यांच्या अध्यक्षा,तालुकाध्यक्षा व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

    ऑक्टोबर 2020 मध्ये जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यासोबतच रोहिणीताई खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाथाभाऊंनी त्यांचं उभं आयुष्य भारतीय जनता पार्टी साठी वाहून दिलं . उत्तर महाराष्ट्राला भाजपाचा बालेकिल्ला बनवला.मात्र त्याच पक्षाने आमदार खडसेंची कोंडी करत राजकीय कारकीर्द संपवण्याची खेळी केली.त्यामुळे नाईलाजाने पक्ष सोडण्याचा निर्णय नाथाभाऊंना जड अंतकरणाने घ्यावा लागला. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी अचूक निशाणा साधत खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करत विधान परिषदेवर संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचा निर्धार आ.खडसेंनी केला, यावेळी भाऊंना साथ देण्यासाठी रोहिणीताई पुढे सरसावल्या. त्यांच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेचे आयोजन करून राष्ट्रवादी संघटन मजबूत करण्यासाठी यशस्वी पाऊल उचलले. रोहिणीताईंची पक्षसंघटनासाठी सुरू असलेली धडपड, त्यांची आक्रमकता, उत्तम संघटन कौशल्य, पक्षासाठी अहोरात्र वेळ देण्याची तयारी, अमोघ वक्तृत्व असे अंगी भूत असलेले नेतृत्व गुण ओळखून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाची माळ रोहिणी ताईंच्या गळ्यात घातली, जबाबदारी अजूनच वाढली. नाथा भाऊंच्या बरोबरीने राज्यामध्ये महिला संघटन कसे वाढवता येईल ? यासाठी जणू त्यांनी आव्हान स्वीकारले.
    पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्या सोबत नुकताच विदर्भ आणि मराठवाडा दौरा करून महिला संघटनेची मोट अधिक मजबूत करण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले. त्याचा परिपाक म्हणून दिनांक 11 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली उपस्थिती लक्षणीय राहिली. रोहिणी ताईंच्या नेतृत्वाखाली आयोजित हे पहिलीच यशस्वी झालेली बैठक हे त्यांच्या कणखर नेतृत्वाची झलकच म्हणावी लागेल.
    2019 च्या निवडणुकीमध्ये अल्पशा मतांनी पराभूत झाल्यानंतर मतदार संघातील जनसामान्यांची सुखदुःख समजून घेण्यासाठी रोहिणी ताई गेल्या चार वर्षापासून सतत जनसामान्यांच्या संपर्कामध्ये आहेत नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अन्य घटना असतील त्या सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. महिलांसाठी तर जणू त्या हक्काचे व्यासपीठ बनलेले आहेत. त्यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेस जनसंवाद यात्रा ही कमालीची यशस्वी झाली. या यात्रेची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली. राज्यात पहिल्यांदाच असं घडलं. व जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनातून काढलेली ही यात्रा रोहिणी ताईंना वैयक्तिक संपर्कासाठी अतिशय महत्त्वाचे ठरली. या यात्रेचे तोंड भरून कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आले.

    जनसंवाद यात्रेसोबतच रोहिणी ताईंच्या संकल्पनेतील ‘आमचे घर –राष्ट्रवादीचे घर’, ‘शिक्षणाचा श्री गणेशा ‘ या दोन्ही अभियानांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोडशेडिंग आंदोलनातील सहभाग असो ही नैसर्गिक आपत्ती असो,प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला ताई तिथे जातीने हजर असतात.जन आक्रोश मोर्चा,कंत्राटी भरती निषेध आंदोलन, स्वयं सिद्धा प्रशिक्षण वर्ग,नवरात्रोत्सव दांडिया कार्यक्रम,गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमातून गुणवंतांच कौतुक अशा वैविध्यपूर्ण उपक्रमातून रोहिणीताई खडसे सतत मतदारांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. राजकारणातून जास्तीत जास्त समाजकारण कसे करता येईल ? यावर त्यांचा कटाक्ष असतो. खानदेश दैवत आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईच्या 744 व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांनी श्रीक्षेत्र कोथळी येथे दिनांक 15 रविवारी ‘भव्य दुर्गा सप्तशती पाठाचे’ आयोजन केले आहे अशा अध्यात्माची प्रचंड आवड असलेल्या सुसंस्कारित रोहिणी ताईंकडे भावी आमदार म्हणून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ मोठया आशेने पाहत आहे. एकंदरीत, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दूरदृष्टीने हेरलेलं रोहिणीताईच्या रुपातील हे प्रभावी नेतृत्व निश्चितपणे राज्यात महिला संघटन मजबूत करुन राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देईल हे निर्विवाद.

    and Women's Office Secretary Swati Tai Mane Former Minister Anil Deshmukh Former Minister Rajesh Tope jayant patil Mumbai Division Women President Surekhatai Pednekar National General Secretary A. Jitendra Awad National Working President Supriya Tai Sule Nationalist Youth Congress State President Mahbub Shaikh Party Leader Chief Spokesperson Vidyatai Chavan rohini khadse sharad pawar State General Secretary Adititai Nalavde State General Secretary Ashatai Bhise State General Secretary Basavaraj Patil State President A. Jayant Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif