रणाईचे येथे प्रौढाची आत्महत्या

0

अंमळनेर: घराच्या छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील रणाईचे येथे दि १३ रोजी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील रणाईचे येथे आनंदराव राघो सुतार (वय ५५) यांनी घराच्या छताला दोरी बांधून १३ रोजी दुपारी अडीच वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. पांडुरंग सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहा पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.