अमळनेर दंगलीतील संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव ;- अमळनेर शहरात झालेल्या दंगली प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी १४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली असून घटनेची माहिती घेत आहेत.

अशपाक उर्फ पक्या सलीम शेख (वय ३३ रा. दर्गा अली मोहल्ला अमळनेर) असे मयत संशयित आरोपीचे नाव आहे. चार दिवसापूर्वी अमळनेर शहरात पेटलेल्या दंगलीमध्ये त्याला संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आले होते. त्याला पोलीस कोठडी मिळाली होती. १३ जून रोजी त्याला मानसिक आजाराच्या लक्षणाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पहाटे तीन वाजता दाखल करण्यात आले होते.

तिथे ९ नंबरच्या कक्षात उपचार झाल्यानंतर त्याला अत्यवस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात बुधवारी १४ रोजी हलवण्यात आले होते. आज बुधवारी दुपारी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र संध्याकाळी त्याची तब्येत खालवल्यानंतर उपचारादरम्यान संध्याकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.