अमळनेरात दगडफेक ; संचारबंदी लागू

0

अमळनेर;- शुक्रवारी रात्री १० वाजता दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक झाल्याची घटना शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजार परिसरात. घडली . प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी सोमवारी सकाळपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लहान मुलांच्या भांडणातून दंगल झाल्याचा अंदाज असून दगडफेकीचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.काही ठिकाणी तोडफोड झाल्याचे दिसून येत आहे. पोलिस दंगलीमागील संशयितांचा शोध घेत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.