पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

0

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील शुक्रवारी मुर्शिदाबादमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राज्यपालांना पत्र लिहून पंचायत निवडणुकांमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी केंद्रीय दलांची व्यवस्था करण्याची विनंती केली. पश्‍चिम बंगालमध्ये काल पंचायत निवडणुका पार पडल्या. परंतु या निवडणुकीला गालबोट लागल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीदरम्यान हिंसाचार झाल्याने निवडणूक सुरळीत पारपाडण्यात काही प्रमाणात अडचणी आल्या.

दरम्यान, काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालांना पत्र लिहून निवडणुकीसाठी केंद्रीय सैन्य तैनात करण्याची मागणी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये ८ जुलै रोजी पंचायत निवडणुका होणार आहेत. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, मुर्शिदाबादच्या खारग्राममध्ये काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली, पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.

खुनाच्या आरोपींना खारग्राम प्रशासनाचे संरक्षण मिळाले आणि त्यानंतर ही हत्या करण्यात आली.याचा निषेध केला जाईल. तृणमूल काँग्रेसला बुलेटची निवडणूक हवी की बॅलेटची निवडणूक? तृणमूल काँग्रेसला आम्ही हे रक्ताचे राजकारण करू देणार नाही असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.