पार्टटाइम नोकरीचे आमिष दाखवून युवकाला सव्वा लाखांचा गंडा

0

जळगाव’= शहरातील एका तरुण बेरोजगाराची पार्ट टाइम नोकरीचे आमीष दाखवून १ लाख ३५ हजार रुपयांमध्ये ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूषण अजित चौधरी (वय ४१, रा. राधाकिसन वाडी, जळगाव) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव असून त्यांना १४ एप्रिल ते ८ जूनच्या दरम्यान पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून एका अज्ञात मोबाईल धारकाने त्यांना मेसेज केला. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना एक वेब लिंक पाठवली. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीच्या दोन बँकेच्या खात्यांमधून चलाखीने १ लाख ३५ हजार ४५६ रुपये काढून घेतले.

त्यानुसार आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी भूषण चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि मीरा देशमुख करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.