गोव्यात वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे आयोजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

राष्ट्राचे सुख हे प्रजेच्या धर्माचरणाचे आनुषंगिक फळ असते, असे आपल्या वैदिक संस्कृतीत म्हटले आहे. त्या दृष्टीने सध्या चालू असलेल्या हिंदु राष्ट्र विषयक चळवळींना एक ठोस दिशा मिळावी, हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी वेगवेगळ्या स्तरांवर कार्यरत असणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे संघटन व्हावे, त्यांच्या अनुभवांचे आदान-प्रदान व्हावे, वैचारिक दिशा सुस्पष्ट व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत, एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे देश-विदेशांतील हिंदुत्वनिष्ठ नेते, कार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थित रहाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.