ऐनपुर येथून ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी लाभार्थी रवाना

0

ऐनपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

दि २७ रोजी ऐनपूर येथून शासनाच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी शासनाकडून लाभ मिळालेल्या लाभार्थी जळगाव येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
सविस्तर असे की जळगाव येथे खास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्यानिमित्त जळगाव जिल्ह्यातील विविध योजनेचे लाभ घेतलेल्या सर्व लाभार्थ्यांना जळगाव येथे आमंत्रित केले आहे, ऐनपूर येथून सुद्धा लाभार्थी रवाना झाले आहे. मंडळाधिकारी शेलकर अप्पा, ऐनपुर गावचे सरपंच अमोल महाजन, ग्रामविकास अधिकारी सुनील गोसावी साहेब, ग्रामपंचायत सदस्य, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच लाभार्थी या कार्यक्रमासाठी रवाना झाले आहे. त्यासाठी शासन प्रशासन तर्फे नियोजन केले गेले. जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. शासनाच्या विविध योजना तळागाळा तील प्रत्येक गरजू लाभार्थी पर्यंत पोहोचणे हा उद्देश ठेऊन शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.