धक्कादायक : सातवीतल्या मुलीने बाळाला दिला जन्म

0

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून खळबळजनक घटना समोर आलीय. बाभळेश्वरच्या आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने बाळाला जन्म दिला आहे.

या सातवीत शिकणाऱ्या मुलीचे दहावीत शिकणाऱ्या एका मुलाशी प्रेम संबंध जुडून त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि मुलगी गर्भवती झाली. ही माहिती घरातील मंडळींना समजल्यावर दोघांच्या कुटुंबीयांनी एकमताने त्यांचे लग्न लावून दिले.

गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील एका रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला. दरम्यान डॉक्टरांना मुलीचे वय कमी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी  ही बाब पोलिसांना कळविली. नंतर पोलिसांनी चौकशी केली असता मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याचे समजले. त्यांचे जरी रीतसर लग्न झाले असले तरीही त्यांचा हा बालविवाह होता. आणि बालविवाहावर कायदशीर बंदी आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.