अमेझॉनने दिले ग्राहकांना मोठे गिफ्ट, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमेझॉनने आपल्या युजर्सना ख्रिसमसच मोठं गिफ्ट दिल आहे. अमेझॉन प्राईम लाईटची सबस्क्रिप्शन फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या सेवेसाठी वर्षाला ९९९ ऐवजी ७९९ रुपये द्यावे लागतील. सोबतच कंपनीने या प्लॅनच्या बेनिफिट्समध्ये देखील बदल केला आहे.

अमेझॉन प्लॅन्स
अमेझॉन भारतातील ग्राहकांना चार प्लान्स ऑफर करते आहे. यामध्ये २९९ रुपयांचा मासिक प्लान ५९९ रुपयांचा क्वार्टरली प्लान, १,४९९ रुपयांचा स्टँडर्ड वार्षिक प्लान आणि ९९९ रुपयांचा अमेझॉन लाईट प्लान यांचा समावेश होतो. याच प्लानची किंमत आता कमी होऊन ७९९ रुपये झाली आहे.

कोणते मिळणार बेनिफिट्स?
अमेझॉन प्राईम लाईट सबस्क्रिप्शनमध्ये यूजर्सना वन-डे-डिलिव्हरी, टू-डे, शेड्यूल डिलिव्हरी तसंच सेम डे डिलिव्हरी असे ऑप्शन्स मिळतात. सोबतच, नो कॉस्ट ईएमआय, अमेझॉन डील्स, सेलसाठी अर्ली अ‍ॅक्सेस असे बेनिफिट्स मिळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.