काय सांगता… मटर-पनीर वरून झाला लग्नात राडा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

लग्न म्हंटल की मानअपमान, रुसवे-फुगवे हे आलेच, कधी वराडकडचे रुस्तात. तर कधी वधूकडच्या लोकांनी एकादी गोष्ट आवडत नाही. पण अशा गोड-आंबट क्षणांना लग्न समारंभ पार पडतो आणि नवदांपत्याला आशीर्वाद देऊन लोक मस्त जेवायला जातात. पण एखाद्या लग्नात जेवणावरूनच राडा झाला तर? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय जेथे लग्नात जेवणावरून, तेही स्पेशली पनीरवरून मोठा राडा झाला. साध्या मुद्यावरून सुरू झालेला वाद बघता, बघता एवढा पेटला की लग्न मंडपाला युद्ध भूमीचं स्वरूप आलं. तो अक्षरश: कुस्तीचा आखाडाच बनला होता.

एका लग्नातील जेवणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये लग्नासाठी आलेली लोक एकमेकांवर खुर्च्या फेकताना, मारामारी करतांना दिसत आहे. तर काही लोकांनी एकमेकांची थेट कॉलरच पकडली.

पनीरच्या भाजीवरून झाला राडा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मटार-पनीरच्या भाजीवरून राडा झाला. वर आणि वाढू या दोघांकडचे नातेवाईक एकमेकांसोमोर आले आणि त्यांच्यात वाद सुरु झाला. मटरपनीरची भाजी मिळाली नाही म्हणून ते एकमेकांवर धावून गेले आणि त्यांच्यातील वाद पेटला. थोड्या वेळाने तर त्यांचं भांडण एवढं टोकाला गेलं की मारहाण सुरू झाली. काहींनी तर एकमेकांवर खुर्च्याच फेकून मारल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.