विश्वचषक 2023; दक्षिण आफ्रिकेने एकाच सामन्यात मोडले अनेक विक्रम…

0

 

विश्वचषक 2023, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत एक मोठा विश्वविक्रम केला आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संघाचा हा विक्रम आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 428 धावा केल्या. यापेक्षा मोठी धावसंख्या विश्वचषकाच्या इतिहासात कधीही बनलेली नाही. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनीही शतके झळकावली.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध केवळ 5 विकेट्स गमावून 428 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी या सामन्यात क्विंटन डी कॉकने 100 धावा, रॅसी व्हॅन डर डुसेनने 108 धावा आणि कर्णधार मार्करामने 106 धावा केल्या. मार्करामची ही खेळी विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक (49) देखील आहे. याशिवाय हेनरिक क्लासेनने 32 धावांची नाबाद खेळी तर डेव्हिड मिलरने 39 धावांची नाबाद खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे ज्याच्या तीन फलंदाजांनी एकाच सामन्यात शतके झळकावली आहेत.

 

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे संघ:

दक्षिण आफ्रिका ४२८/५ वि श्रीलंका, दिल्ली, २०२३

ऑस्ट्रेलिया ४१७/७ वि अफगाणिस्तान, पर्थ, २०१५

भारत 413/5 वि बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, 2007

दक्षिण आफ्रिका ४११/४ वि आयर्लंड, कॅनबेरा, २०१५

दक्षिण आफ्रिका ४०८/५ वि वेस्ट इंडीज, सिडनी, २०१५

श्रीलंका 398/5 वि केनिया, कॅंडी, 1996

इंग्लंड 397/6 वि अफगाणिस्तान, मँचेस्टर, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.