माध्यमशास्त्र प्रशाळेत बातमी लेखन विषयावर कार्यशाळा

0

जळगाव.;– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेच्या वतीने दि. १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी माध्यमशास्त्र प्रशाळेत बातमी लेखन विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी लेखनासाठी लेखन कौशल्य महत्वाचे आहे. सामाजिक, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये एखाद्या व्यक्तीकडे बातमी लेखनाची जबाबदारी दिली जाते. बातमी कशी लिहावी, बातमी लेखनाचे तंत्र काय ? याची माहिती व्हावी यासाठी माध्यमशास्त्र प्रशाळेतर्फे दि. १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी माध्यमशास्त्र प्रशाळेत बातमी लेखन विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार असून ही कार्यशाळा निशुल्क आणि सर्वांसाठी खुली आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.सुधीर भटकर (8407922404), डॉ.गोपी सोरडे (9834166072) अथवा दूरध्वनी क्र. 0257-2257438 वर संपर्क साधावा असे आवाहन माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.