अडीच महिन्यांपासून फरार हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

गेल्या अनेक दिवसांपासून जळगावात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. त्यात किरकोळ वाद ते अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना देखील घडतं आहेत. त्यामुळे पोलिसांचे भय गुन्हेगारांना आहे कि नाही? हा प्रश्न साऱ्या जळगावकरांच्या समोर उभा राहिला आहे. त्यात आज पोलिसांनी एका फरार असलेल्या गुन्हेगाराला तब्यत घेतले आहे. एका तरुणावर जून्या वादातून धारदार शस्त्राने वार करून अडीच महिन्यांपासून फरार असलेल्या ललित उमाकांत दीक्षित याला एमआयडीसी पोलिसांनी पाळधीतील एका हॉटेलमध्ये अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जुन्या वादातून सम्राट कॉलनीतील शुभम भगवान माळी यांच्यावर ललित उमाकांत दीक्षित याच्यासह दोन साथीदारांनी २७ जुलै रोजी धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ललित हा फरार होता. ललित याच्यावर यापूर्वी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शुक्रवारी तो पाळधी येथे आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. संशयित पाळधी येथील एका हॉटेलमध्ये येताच त्याला पो.उ.नि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ किरण पाटील, सचिन पाटील, इमरान सय्यद, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, योगेश बारी, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी यांच्या पथकाने अटक केली. शनिवारी त्याला न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.