महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे डरपोक मुख्यमंत्री ; आदित्य ठाकरे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याच्या राजकारण आजचा दिवस चांगलाच तापला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे नेते आक्रमक झाले आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक रद्द झाल्याने देखील ठाकरे गट आणि माणसे आक्रमक झाले आहे. याचदरम्यान सिनेट निवडणुकीवरून ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यातच जुंपलेली बघायला मिळत आहे. याचदरम्यान आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेला नकार अंदाज करत शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केले आहे. त्यांनी अशी निवडणूक स्थगित करणे हे अतिशय धोकादायक आहे. कारण आज ही निवडणूक स्थगित केली. उद्या लोकसभेच्या देखील निवडणूका स्थगित केल्या जातील. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे डरपोक मुख्यमंत्री आहे. ते डरपोक आहेत हे आता भाजपाला ही पटलेले आहे. तर भाजपने एका डरपोक माणसाला घेतलेलं आहे. हे सरकार निवडणुकांना का घाबरताय? असा सवाल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.