सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळलेत; चंद्रशेखर बावनकुळे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळलेत, त्यांचं डोकं काम करत नाहीये. पुन्हा सत्तेत यायची संधी नाहीये. पक्ष फुटला आहे, चिन्हही गेलं आहे. आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आली आहे. त्यामुळे आता आयुष्यात कधीही सत्तेत येऊ शकत नसल्याचं त्यांना दुःख आहे. त्यांना दोन प्रकारचं दुःख आहे. एक सत्ता गेल्याच आणि दुसरं कधीही सत्तेत न येण्याचं, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीये.

२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) मुख्यमंत्री असतील. येत्या निवडणूका एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) गट आणि भाजप एकत्र लढणार आहे. विरोधक काहीही बोलत असतात. बहुमत असलेलं आमचं सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील आणि पुढेही राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्याविषयी भाष्य केले. कॅगने रिपोर्ट दिला. एखाद्या योजनेवर खर्च वाढू शकतो. कॅगला याबाबत योग्य उत्तर दिले जाईल. नितीन गडकरींना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न नाही. विरिधकांकडून हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पण, नितीन गडकरी आमचे नेते आहे.

सोबतच त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. दररोज सकाळी माध्यमांसमोर येऊन संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. असं बावनकुळे म्हणाले. आमचूर महायुतीला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.