उबर कॅब चालकाचे गैरवर्तन.. अभिनेत्री मनवा नाईकने FB वर लिहिली आप बीती; आरोपीला अटक…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मराठी चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक यांनी एका उबेर कॅब चालकाने आपल्याशी गैरवर्तन करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ती टॅक्सी करून तिच्या घरी जात असताना ही घटना घडल्याचे तिने सांगितले. शनिवारी तिच्या फेसबुक अकाऊंटवर या घटनेबद्दल लिहिले आहे.

या प्रकरणानंतर अवघ्या २४ तासांच्या आत मुंबई पोलिसांनी तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला अटक केली आहे. तसेच त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी अभिनेत्रीच्या फेसबुक पोस्टला उत्तर देताना पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून लवकरच दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

फेसबुक पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की, तिने घरी जाण्यासाठी रात्री 8.15 वाजता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधून कॅब घेतली. ती कॅबमध्ये बसली असता ड्रायव्हर फोनवर कोणाशी तरी बोलत होता. याबाबत त्यांनी चालकाला हटकले. त्यानंतर ड्रायव्हरने बीकेसी येथे रेड सिग्नल जंप मारले.  त्यानंतर पोलिसांनी त्याची कॅब थांबवली आणि त्याच्या कारचा फोटो क्लिक केला. चालकाचा वाहतूक पोलिसाशी वाद सुरू झाला. यावर अभिनेत्रीने पोलिस कर्मचाऱ्याला कॅब सोडण्यास सांगितले कारण त्याने आधीच फोटो क्लिक केला होता. यावर चालकाला राग आला आणि त्याने अभिनेत्रीवर आरडाओरडा सुरू केला. ड्रायव्हरने अभिनेत्रीला विचारले की, तू दंडाचे ५०० रुपये देणार का? या वादात अभिनेत्रीने ड्रायव्हरला कॅब पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. मात्र ड्रायव्हरने कॅब अंधाऱ्या जागी थांबवली. त्यानंतर चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि चुनाभट्टी रोड ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानच्या रस्त्याच्या दिशेने कार वळवली. अभिनेत्रीने उबर सुरक्षा हेल्पलाइनवर कॉल केला. यानंतर चालकाने गाडीचा वेग वाढवला.

अभिनेत्रीने सांगितले की, तिने ड्रायव्हरला कार थांबवण्यास सांगितले, परंतु त्याने तसे केले नाही आणि कोणाला तरी कॉल करण्यास सुरुवात केली. यानंतर अभिनेत्री घाबरली आणि मदतीसाठी ओरडू लागली. यानंतर एका दुचाकी आणि ऑटोरिक्षाने कार थांबवली आणि अभिनेत्रीला कारमधून बाहेर काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.