चितेगाव येथे विज पडून महिलेचा जागीच मृत्यू…

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आज दि. १७ रोजी चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव परिसरात विजांसह झालेल्या पावसात वीज पडून एका शेतातील मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शेत मजूरी करणाऱ्या संगिता सुरेश शिंदे (४८) शामवाडी शिवारात मयूर कुमावत यांच्या शेतात काम करीत असतांना अचानक दुपारी चार वाजता सुरु झालेल्या विजांसह पावसात त्यांच्या अंगावर विज पडून त्यांचा जागिच मृत्यू झाला. या घटनेने चीतेगावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.