दुचाकीस्वार तरुणास भरधाव ट्रकने चिरडले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दुचाकीने कामावर जात असतांना तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. मनोहर उर्फ मनोज कडू वाघ (वय २५, रा. अहिरवाडी ता. रावेर) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे मनोहर उर्फ मनोज कडू वाघ (वय २५) हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. तो  हातमजूरी करून तो कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो दुचाकीने नेरुळ येथे कामावर जात असतांना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यात मनोहर दुचाकीवरुन रस्त्यावर कोसळताच ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाला.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मनोहरच्या मित्रांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तात्काळ रुग्णालात दाखल असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला.  मनोहरच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार असून त्याची पत्नी गरोदर असल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.