साकेगावत वाळूचा अवैध साठा करणाऱ्या डंपरवर कारवाई

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील साकेगाव शिवारात ग्रामपंचायतीच्या हद्दीत अवैध्य वाळूसाठा केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून कारवाई केली. महसुलच्या पथकाने तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे साकेगाव शिवारात ग्रामपंचायतीच्या हद्दीत अवैध्य वाळूसाठा असेल्या ठिकाणी रविवारी (दि. ३) रोजी छापा टाकला. त्या ठिकाणी सांबर (क्रमांक जीजे १८, एयू ७४०४) आढळून आले. डंपर तपासले असता त्यात अंदाजे दोन ब्रास वाळू आढळून आली आहे. पथकाचे वाहन पाहताच वाहनचालक व मजुरांनी तेथून पळ काढला.

काही वेळाने वाहनचालक वाहनाजवळ येऊन वाहन मालकी हक्काबाबत माहिती दिली. हे डंपर गोलू सोनार (रा. भुसावळ) यांचे मालकीचे असल्याचे सांगितले आहे. जप्त केलेले डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

या कार्यवाहीमध्ये भुसावळ मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे, भासवलं तलाठी पवन नावगोळे, तलाठी वराडसीम नितीन यांनी डंपर जमा केले. वाहनचालक, विलास नारखेडे, कोतवाल साकेगाव जितेश चौधरी, पोलिस पाटील साकेगाव भोई व तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.