मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या नऊ दिवसांपासून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. तर, गेल्या पाच दिवसांपासून मराठा आंदोलकांची राज्यभरात निदर्शने सुरु आहे. मराठा समजला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. मात्र, त्यावर काहीही तोडगा निघालेला नाही. मनोज जरांगे पाटील यांची तर उपोषणामुळे प्रकृती बिघडत आहे. त्यांना उपोषण देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. मात्र, त्यावर काहीही तोडगा निघालेला नाही. मनोज जरांगे पाटील यांची उपोषणामुळे प्रकृती बिघडली आहे. त्यांना उपोषण स्थळीच सलाईन लावण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याया निर्धाराला त्यांच्या मुलीनेही बळ देण्याचं काम दिल आहे.

काय म्हणाली कन्या ?
पप्पा आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने केलं आहे. माझे पप्पा हट्टी आहेत, ते असे उठणार नाही. माझ्या वडिलांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्यास सरकार जबाबदार असेल. मला पण भविष्यात आयपीएस व्हायचं आहे. असं मनोज जरांगे पाटील यांची मुलगी म्हणाली.

लाठीचार्ज झाला त्यात पोलिसांचा काहीही एक दोष नाही. वरून ऑर्डर आल्यामुळे त्यांना करावा लागला. वडिलांच्या तब्येतीचं काही बरं वाईट झालं तर याला सरकार जबाबदार असेल. पप्पांची काळजी वाटते मात्र समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण आरक्षण मिळाल्याशिवाय त्यांनी उपोषण सोडू नये, असं सांगतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या कन्येला अश्रू अनावर झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.