दुचाकींची समोरासमोर धडक ; एक गंभीर

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाजवळ दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हमीद शेख मोहम्मद शफी (वय-३८) रा. पिंप्राळा हुडको,हा बुधवार १९ एप्रिल रोजी हमीद शेख हा त्याच्या दुचाकीने नुतन मराठा महाविद्यालयाजवळून जात असतांना समोरून अज्ञात दुचाकीधारकाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात हमीद शेख हा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. या अपघात प्रकरणी गुरूवार २० एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार संगिता खांडारे पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.