ट्विटरने काढले कलाकारांच्या नावासमोरून ‘ब्लू टिक’

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

आज ट्विटर (Twitter) कडून मोठा झटका अनेक जणांना बसला होता. ट्विटरने अनेक दिग्गजांचे ब्लू टिक आज सकाळपासून त्यांच्या नावासमोरून काढून टाकले होते. यात बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांचा समावेश होता. विशेष म्हणजे बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा देखील यात समावेश होता. ट्विटरच्या ब्लू टिकचा विषय इतका मोठा होता की ‘ब्लू टिक’ ट्विटरवर ट्रेंड होत होता. आता खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत ट्विटरला ब्लू टिक देण्याची विनंती केली आहे.

काय म्हंटले बिग बी
ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम … तो उ जो नील कमल ✔️ होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया, ताकि लोग जान जायें की हम ही हैं – Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा 👣जोड़े पड़ी का ??

अशा खोडकर अंदाजात बिग बी यांनी ट्विटर कडे विनंती केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.