ट्रकची आयशरला धडक ; चालक गंभीर

0

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या आयशर वाहनाला जोरदार धडक दिल्याने आयशर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील म्हसले गावाच्या बसस्थानकाजवळ गुरूवारी २० रोजी सकाळी ९ वाजता घडली असून याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील म्हसले गावाच्या बसस्थानकाजवळ गुरूवार २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आयशर चालक चुनिलाल दिलीप देसले (वय-४१) रा. देवभाने ता.जि.धुळे हे आयशर क्रमांक (एमएच १८ एए ४३८९) ने जळगावकडून अमळनेरकडे जात असतांना समोरून येणारा भरधाव ट्रक क्रमांक (एमएच १८ बीए ६१०) याने जोरदार धडक दिली. या अपघातात आयशरचालक चुनिलाल देसले यांना गंभीर दुखापत झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रक चालक माधवराव रामदास पाटील रा. नगाव जि.धुळे याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.